‘रब्बी’ कांद्याची लागवड

‘रब्बी’ कांद्याची लागवड
Published on: 
(सिंगल कॉलम जागेनुसार वापरावी) ‘रब्बी’ कांद्याची लागवड ४० ते ४२ हजार हेक्टरवर जळगाव, ता. १ : खानदेशात आगाप रब्बी किंवा उन्हाळ कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे. यंदा लागवड कमी पाऊस असल्याने काहीशी कमी होईल, असे चित्र आहे. खानदेशात रब्बीतील कांद्याची लागवड ४० ते ४२ हजार हेक्टरवर होत असते. यंदा ही लागवड मुबलक जलसाठ्यांच्या भागात काहीशी वाढेल. तर दुष्काळप्रवण क्षेत्रात लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. परंतु एकूण लागवड कमी होवू शकते, असाही अंदाज आहे. धुळे, साक्री, शिंदखेडा भागात लागवड घटेल. एकट्या साक्री तालुक्यातील लागवड सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर असते. पण कमी पावसाने लागवड तेथे कमी होईल. तापी काठी स्थिती बरी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, चाळीसगाव या भागांत कांदा लागवड वाढू शकते. तर नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार भागांत कांदा लागवड घटेल. एकूण लागवड यंदा २५ ते ३० हजार हेक्टरवर खानदेशात राहू शकते. कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. काही शेतकऱ्यांना अजून लेट खरिपातून उत्पादन हाती आलेले नाही. कांदा लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू आहे. अनेकांनी कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी केले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कांदा बियाणे खरेदी केले आहे. लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या कांदा रोपवाटिका निर्मितीवर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.