रब्बी पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर तर १.५ टक्के विमा हप्ता जिल्ह्यातील पाच पिकांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

रब्बी पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर तर १.५ टक्के विमा हप्ता जिल्ह्यातील पाच पिकांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन
Published on: 
रब्बी पिकांसाठी १.५ टक्के विमा हप्ता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ८ : खरिपातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना पाण्याअभावी रब्बी हंगामही बेभरवशाचा झाला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, तसेच पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी आर्थिक वर्षात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. रब्बी पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर असून, शेतकऱ्यांना १.५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत पीक विमा अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील रब्बी ज्वारी, गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकांचा योजनेत समावेश आहे. रब्बी ज्वारीसाठी (बागायत व जिरायत) ३० नोव्हेंबर, गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत विमा हप्ता भरण्याची मुदत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक, पीक नुकसानभरपाईसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. योजनेत शेतकरी सहभागासाठी प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. योजनेत स्वेच्छेने सहभाग घेता येणार असून, कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांनाही सहभागी होता येईल. तसेच सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के, तर उन्हाळी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू आहे. कुळाने अथवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. मात्र, नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसल्यास कर्जदार शेतकऱ्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः अर्ज करावा. तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फतही योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. ...असे आहे विमाकवच पीक - विमा संरक्षण - शेतकरी हिस्सा गहू - ४५ हजार - ६७५ ज्वारी - ३६ हजार - ५४० भुईमूग - ४० हजार ६०० - ६०८ हरभरा - ३६ हजार - ५४० कांदा - ९५ हजार - १,४२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.