

Rabi crop insurance announced for six crops, with onion receiving the highest insurance coverage of ₹95,000 per hectare.
eSakal
नाशिक : दुष्काळामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाने व केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता ‘सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना’ लागू करण्यात आली. जिल्ह्यातील सहा प्रमुख अधिसूचित पिकांसाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, शेतकरी हप्ता व नोंदणीच्या अंतिम तारखा निश्चित केल्या आहेत.