ISKCON मंदिरात राधाष्टमी महोत्सव; भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी

Radhashtami 2022 at ISKCON
Radhashtami 2022 at ISKCONesakal
Updated on

नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघात (इस्कॉन) श्री राधाष्टमी अर्थात श्रीमती राधाराणीचा जन्मदिवस ‘राधे राधे’च्या जयघोषात रविवारी (ता. ४) झाला. दिवसभर झालेल्‍या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उत्‍स्‍फूर्तपणे हजेरी लावली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर होणारा हा दुसरा मोठा उत्‍सव असून, यानिमित्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (Radhashtami Festival at ISKCON Temple Nashik Latest Marathi News)

राधाष्टमीनिमित्त मुंबईहून शिवराम प्रभू नाशिकला आले होते. ते प्रवचनात म्‍हणाले, की श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. मात्र, राधाराणीची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाल्‍यास, त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. राधाराणीच्या कृपेची याचना करत कुणी अश्रू ढाळल्‍यास त्याला आयुष्यभर दुःखाश्रू ढाळावे लागणार नाही.

राधाराणी व श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे.
महोत्सव यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समितीप्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युतप्राण प्रभू, गोपालानंद प्रभू, रणधीर कृष्ण प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, आनंदचैतन्य प्रभू, सुमेध पवार, अकिंचन दास, सेवाप्रमुख नादियाकुमार दास, तुलसीसेविका माताजी, प्रिया गोरे माताजी आदींनी परिश्रम घेतले.

Radhashtami 2022 at ISKCON
women invitational cricket competition : अनन्या साळुंखे नाशिकची कर्णधार

दिवसभर धार्मिक कार्यक्रम

राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधाकृष्णाच्या विग्रहांची सजावट केली होती. महोत्सवाला सकाळी पाचपासून मंगल आरतीने सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व श्रीमद्‍भागवत प्रवचन झाले.

राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन, तसेच अन्य व्रजभक्ती गीते सादर करण्यात आली. श्रीश्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा दुपारी पंचामृताने अभिषेक केला. अभिषेकानंतर महाआरती व महाभोग अर्पण केला. दुपारी बाराला ५६ भोग श्रीमती राधाराणीला अर्पण करण्यात आले व महाआरती झाली.

Radhashtami 2022 at ISKCON
ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मालेगावच्या तरुणास मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Revenue department corruption Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com