VNI26B13481
वणी ः येथील बिरसा मुंडा चौकात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ग्रामस्थ, कार्यकर्ते
-----------
३०-२
राघोजी भांगरे जयंतीनिमित्त
वणी ग्रामस्थांचे अभिवादन
-----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१३ : आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची जयंती येथील बिरसा मुंडा चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शेतकऱ्यांना शेतसारा आणि सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र लढा उभारला. त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण करण्यात आले. प्रा. अशोक बागूल यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय इतिहासाची माहिती दिली. सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, कारभारी कड, जगन वाघ, माधवराव बागूल, प्रकाश मोढे, राजेंद्र खांडवी, संदीप जगताप, रोहित गायकवाड, पीनू मोढे, वसंत गांगोडे, किरण गायकवाड, गणेश कड, विजय गोतरणे, गणेश कडाळे, रवी भरसट, गौतम गांगुर्डे, विकी नवले, राहुल पवार, रवींद्र जगताप, सागर चौधरी, भीमराज धुम, पियुष भवर, हिरामण जाधव, दादा राठोड आदी उपस्थित होते. अमोल गावित यांनी प्रास्ताविक केले. संदीप जगताप यांनी आभार मानले.
--------------