rahul gandhi
sakal
नाशिक: काँग्रेसच्या संघटन सृजन या प्रशिक्षण शिबिरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना पक्षासोबत एकनिष्ठ कसे रहावे, याचा कानमंत्र दिला. तसेच महिलांचा सन्मान, महाराष्ट्रातील ‘एसआयआर’चे प्रश्न, ‘जेन झी’सोबत संवाद वाढविण्याचा आणि शेती, उद्योग, आदिवासी, बेरोजगारीची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा मूलमंत्र देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) पायरी कधीही चढू नका, असा सल्लाही दिला.