Nashik News : पथक आले रे...आकडे सांभाळा; वीज वितरण कंपनीकडून वीजचोरांवर छापा

गावपरीसरात अचानक वीज महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयांतर्गत भरारी पथकाने वीजचोरांना जोर का झटका दिला.
electricity thief
electricity thiefesakal

अंबासन, (जि.नाशिक) : येथील गावपरीसरात अचानक वीज महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयांतर्गत भरारी पथकाने वीजचोरांना जोर का झटका दिला.

गावातील चौकात सदर पथक दाखल होताच 'पथक आले रे...आकडे सांभाळा' अशी सुचकता गावात पसरताच बहुतांश लपून छपून वीजेची चोरी करणा-यांची चांगलीच दमछाक उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते. (Raid on electricity thieves by electricity distribution company nashik news)

 ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा बसावा म्हणून महावितरण कंपनीकडून तपासणीमोहीम स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार अंबासनसह इतर गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्र सुरूच ठेवले आहे. वीजचोरी रोखण्यासाठी कार्यालयांतर्गत भरारी पथक तयार करण्यात आले असून सदर पथक वीजचोरांवर अचानक छापा टाकून शोध घेत आहेत.

घराजवळील गेलेल्या वीजवाहक तारांवर सर्रास आकडे टाकून बरेच महाभाग वीजचोरी करतात. यामुळेच नियमानुसार वीज कनेक्शन असलेल्या सर्वसामान्य वीजग्राहकांना फटका बसत असल्याचे ग्राहकांकडून सांगितले जाते. मंगळवार (ता.६)  रोजी कुणालाच कानोसा न देता अचानक सदर पथकाने गावात धाडसत्र सुरू केले.

electricity thief
Nashik News : दिव्यांग जलतरणपटू ईश्वरीने घडविला प्रेरणादायी इतिहास; ‘नॅब’ कडून गौरव

बहुतांश वीजचोरट्यांनी वीजप्रवाह करणाऱ्या तारेवरील आकडे पथकाची चाहुल लागताच काढून फेकले तर काहींच्या वायरी जप्त करण्यात आल्या. पथकाकडून गावात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणादणले होते तर वीजग्राहकांकडून पथकाने वीजचोरांवर छापा टाकल्याने स्वागत केले आहे.

गावात पथकाने प्रवेश करताच गावात वा-यासारखे वृत्त पसरताच सावधगिरीचा पवित्रा अनेकानेकांकडून घेण्यात आला होता. वीजचोरी न करता दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वीजकनेक्शन घ्यावे असे आवाहन वीज महावितरण कंपनीकडून केले जात आहे.

''नागरिकांनी नियमित वीजबिल भरून वीज महावितरणाला सहकार्य करावे, वीजचोरी करू नये अन्यथा वीज महावितरण कंपनीकडून कठोर कारवाई करण्यात येईल.''- नितिन सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता. 

electricity thief
Nashik News : पहिला वातावरण बदल आराखड्याचे उद्या प्रकाशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com