Nashik Crime: मुसळगावमध्ये कुंटणखान्यावर धाड; 3 तरुणींसह चौघे पुरुष ताब्यात

action against Kuntankhana
action against Kuntankhanaesakal

Nashik Crime : मुसळगाव (ता. सिन्नर) येथील सहकारी औद्योगिक वसाहत परिसरात हॉटेलच्या आडून चालवण्यात येणाऱ्या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली.

रविवारी (ता. २८) सायंकाळी करण्यात आलेल्या या सिनेस्टाईल कारवाईत कुंटणखाना चालकासह शरीरविक्रय करणाऱ्या तीन महिला व तीन ग्राहकांना पथकाने ताब्यात घेतले. (Raid on Kuntankhana in Musalgaon Four men including 3 young women in custody Nashik Crime)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोरील लहामागे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉटेल मनोज येथे कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.

या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून ही कारवाई केली. पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकदेखील कारवाईत सहभागी झाले होते.

पोलीस पथक साध्या वेशात लहामगे कॉम्प्लेक्सच्या परिसरात दाखल झाले. हॉटेलला लागूनच असलेल्या वरच्या मजल्यावर एका खोलीत कुंटणखाना चालवला जात असल्याचे व आतमध्ये महिलांसह काही पुरुष ग्राहक असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती.

मात्र, कुंटणखानाचालक महेश लहामगे याने वरच्या मजल्यावर जाणारा जिन्याचा मार्ग आतून कुलूप लावून बंद केला होता. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते व मंगेश गोसावी यांनी पाठीमागच्या बाजूने शिडी लावून वरच्या मजल्यावर गच्चीत प्रवेश मिळवला.

तर पथकातील पोलीस कर्मचारी भूषण रानडे, संदीप शिरोळे यांनी संरक्षक दरवाजाच्या जाळीवरून चढून पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. अन्य कर्मचारी जिन्यातील दरवाजाजवळ दबा धरून बसले होते. सहाय्यक निरीक्षक गीते यांनी खोलीत दडून बसलेल्या लहामगे यास दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

या वेळी खोलीत तीन महिला तीन पुरुष ग्राहकांसोबत आढळून आल्या. यातील एक महिला पश्‍चिम बंगालची, एक उत्तर प्रदेशातील व एक स्थानिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. लहामगे याच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खोलीतून सुमारे दोन हजार रुपये रोख, नऊ मोबाईल, निरोध पाकिटांचा बॉक्स, सिगरेटची पाकिटे, महिलांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

action against Kuntankhana
Crime : पदवीची विद्यार्थिनी अल्पवयीन मुलाला घेऊन पळाली; आळंदीत केला विवाह

संशयीतांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक श्री. पाटील, सहाय्यक निरीक्षक श्री. गीते यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस शिपाई दिलीप पगार, प्रशांत पाटील, विश्‍वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, महिला कर्मचारी छाया गायकवाड, श्रीमती गांगुर्डे, श्रीमती चव्हाण आदींचा या पथकात समावेश होता.

बदलीच्या प्रतिक्षेचाही परिणाम

ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दोन महिन्यांपूर्वीच बदलले असून, बदलीच्या प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच तालुक्यात सर्वदूर सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत या प्रभारी अधिकाऱ्यांकडे पुरेशी माहिती नाही. ज्या ठिकाणची माहिती मिळेल, त्या ठिकाणी कारवाई करताना संबंधित बीटातील कर्मचारी बदलीच्या तोंडावर काम वाढायला नको म्हणून नाखूश असतात.

बाहेरील पथकांकडून कारवाई झाल्यास प्रभारी अधिकाऱ्यांना वरिष्ठांचा ठपका सहन करावा लागतो. सिन्नर एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्यांत मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

बदलीच्या प्रतीक्षात असलेल्या या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अवैध व्यवसाय निर्मूलनाच्या मोहिमेला देखील खीळ बसली असल्याचे बोलले जात आहे.

action against Kuntankhana
Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com