येवला- येथील हॉटेल लक्ष्मी विजयमध्ये लॉजवर अवैध देहविक्रयच्या व्यवसायावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला आहे. शहरातील बसस्थानकासमोरील वर्दळीच्या ठिकाणी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून दोन एजंटांना अटक करण्यात आली आहे. येवला न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.