Nashik Crime News : जानोरी शिवारातील गोदामावर छापा; 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Gutkha Seized by police
Gutkha Seized by policeesakal

नाशिक : जानोरी शिवारातील जानोरी-मोहाडी रोडलगत असलेल्या गोदानावर दिंडोरी पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ४६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Raid warehouse in Janori area 19 lakhs of banned Gutkha seized Nashik Latest Crime News)

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Gutkha Seized by police
Gujarat Assembly Elections : गुजरातच्या निवडणुकीत नाशिकच्या BJP आमदारांचा डंका!

दिंडोरी पोलिसांना परराज्यातून अनधिकृतरित्या प्रतिबंधित गुटखा आणण्यात आल्याचा खबर मिळाली होती. त्यानुसार, उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जानोरी शिवारातील जानोरी-मोहाडी रोडलगत असलेल्या आशापुरा गोदामावर गुरुवारी (ता. ८) सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी गोदामात माणिकचंद मिनी नावाचा प्रतिबंधित गुटख्याच्या १६ लाख ५६ हजार रुपयांचे २०० गोण्या, १ लाख ९ हजार २०० रुपयांचा गोवा-१००० नावाच्या प्रतिबंधित गुटख्याच्या २० गोण्या, १ लाख ५० हजार रुपयांचा माणिकचंद पान मसाल्याच्या २० गोण्या, ३१ हजार २०० रुपयांचा एमसी सेंटेड तंबाखुच्या २० गोण्या असा १९ लाख ४६ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालाचा साठा करण्यात आलेला होता.

सदरील माल हा महाराष्ट्रात प्रतिबंधित असूनही त्याची विक्री केली जात होती. सदरचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित शनी हनुमान गुप्ता (रा. व्हिलेज, पो. छापर, सुलतानपुरा, उत्तरप्रदेश), प्रदीप शर्मा (रा. मुंबई) या दोघांविरोधात दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पांडुरंग कावळे हे पुढील तपास करीत आहेत.

Gutkha Seized by police
Gyandip Gurukul Crime Case : अत्याचार प्रकरणातील मोरेला पुन्हा पोलिस कोठडी; 7 स्वतंत्र गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com