साक्री व्याख्यानमाला समारोप

साक्री व्याख्यानमाला समारोप
Published on: 
धुळे : टुडे पान ४ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 33271 साक्री : श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘दुर्गराज रायगड : जागतिक वारसा संवर्धन आणि शाश्वत विकास’ या विषयावर बोलताना वरुण भामरे. समोर उपस्थित मान्यवर, श्रोते. -- रायगडाचे संवर्धन, शाश्वत विकास ही काळाची गरज -- वरुण भामरे : साक्रीत २६ व्या शारदोत्सव व्याख्यानमालेचा समारोप सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २२ : ऐतिहासिक दुर्गराज रायगड किल्ल्याचे जागतिक वारसा म्हणून संवर्धन करतानाच तिथे शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासनाच्या रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून यशस्वीपणे हे काम सुरू असल्याचे प्रतिपादन प्राधिकरणाचे आर्किटेक्ट वरुण सर्जेराव भामरे यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे झालेल्या शारदोत्सव व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. - वाचनालयाचे उपाध्यक्ष सुरेश सोनवणे अध्यक्षस्थानी होते. आर्किटेक शरद देवरे, प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे, डी.वाय.एस.पी. ओंकार गवळी, सांस्कृतिक समिती प्रमुख प्राचार्य डॉ. लहू पवार, प्रा. डी. एन. खैरनार, पी. झेड. कुवर, डॉ. तुळशीराम गावित, पोपटराव सोनवणे, डॉ. डी. एस. चव्हाण, व्ही. यू. मराठे, गोविंदराव ठाकरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉ. शत्रुघ्न पाटोळे, अरुण पाटील, कुसुम शिंदे, विशाखा भामरे, संगीता पाटील, सुनील भदाणे आदीसह श्रोते उपस्थित होते. - रायगड अस्मितेचा वारसा श्री. भामरे यांनी ‘दुर्गराज रायगड: जागतिक वारसा संवर्धन आणि शाश्वत विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर त्यांनी माहिती दिली. शिवकाळातील वास्तुकलेचा अभ्यास करूनच पुढील संवर्धनाचे आराखडे तयार केले आहेत. गडावरील पाण्याचे व्यवस्थापन आणि मूळ दगडी वास्तूंचे जतन करून पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न टीम करत आहे. हा विकास करताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्थानिक रोजगार आणि गड संवर्धन यांची योग्य सांगड घालणारा शाश्वत विकास आराखडा त्यांनी सादर केला. रायगड हा केवळ पर्यटनाचे केंद्र नसून तो आपल्या जाज्वल्य इतिहासाचा आणि अस्मितेचा जिवंत वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. भाग्यवान श्रोत्यांना वक्ते व अतिथींच्या हस्ते पुस्तके देऊन गौरविण्यात आले. डॉ. नरेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी वक्त्यांचा परिचय दिला. सांस्कृतिक समिती प्रमुख पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com