Nashik News: ट्रॅक्टरच्या धडकेने रेल्वे फाटक बंद! निफाड स्थानकाजवळ दीड तास वाहतुकीचा खोळंबा

सुरत-सापुतारा-पिंपळगाव-निफाड-येवला- शिर्डी या महामार्गावर गुरुवारी (ता. ४) दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वे फाटक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडून सुमारे दीड तास वाहतूक खोळंबली होती
Workers repairing a closed railway gate
Workers repairing a closed railway gateesakal
Updated on

निफाड : सुरत-सापुतारा-पिंपळगाव-निफाड-येवला- शिर्डी या महामार्गावर गुरुवारी (ता. ४) दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वे फाटक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडून सुमारे दीड तास वाहतूक खोळंबली होती.

यामुळे दोन्ही बाजूने तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Railway gate closed due to tractor collision One half hour traffic jam near Niphad station Nashik News)

पिंपळगावकडून ‘निफाड’कडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने निफाड रेल्वेस्थानकालगत असलेल्या रेल्वे गेटला जोराची धडक दिली. त्यामुळे पिंपळगाव बाजूकडील रेल्वे गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट बंद पडले.

त्यामुळे सुमारे दोन तास दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. डाव्या व उजव्या बाजूला कुंदेवाडी गावापासून तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सुरत-शिर्डी मार्गावर वाहतूक वाढली आहे. निफाड रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे गेटमध्ये इतर वेळेसही सलग रेल्वे गाड्या असल्याने कधी कधी अर्धा तास दोन्ही बाजूकडून वाहतूक रोखली जाते.

गुरुवारी गेट बंद झाल्याने दीड तास वाहतूक रोखल्याने साईभक्त, प्रवासी, विद्यार्थी, अशा अनेक प्रवाशांना गाडीतच बसून राहण्याची वेळ आली. यामुळे वेळ वाया गेल्याने अडकलेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

Workers repairing a closed railway gate
Nashik: जिल्ह्यात 6 हजारावर पत्रव्यवहार, फाईलिंग ऑनलाइन; ऑपरेटर सहाय्यक कम ड्रायव्हर असा नव्या प्रकाराचा जन्म

उड्डाणपुलच्या संथगतीने काम

गेल्या अनेक वर्षांपासून निफाड रेल्वेस्थानकाजवळ सुरत-शिर्डी मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याची गती पाहता त्याला आणखी किती दिवस लागेल, हे कोडच आहे. अनेक वेळेला या रस्त्यावरील निफाड रेल्वे फाटक बंद पडते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

त्याचा वाहतूकदार व प्रवाशांना फटका बसतो. मात्र, त्याचे कोणाला सोयरसूतक नाही. येथील उड्डाणपुलानंतरचे उड्डाणपूल तयार झाले, तरी निफाड रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल होत नसल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

Workers repairing a closed railway gate
Nashik News: स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी घरात वीजपुरवठा; अवघ्या 12 दिवसात उदिष्ट पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.