Nashik Crime : रेल्वे पोलीस आणि आरपीएफ सतर्क; काशी एक्स्प्रेसमधील ६० हजारांचा आयफोन चोरणाऱ्याला पकडले
Stolen iPhone Recovered by Nashik Railway Police : नाशिक रोड रेल्वे स्थानकातून काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा आयफोन चोरी करणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला.
नाशिक रोड: रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्क गस्तीदरम्यान काशी एक्सप्रेसमधून चोरलेला साठ हजार रुपयांचा आयफोन जप्त करण्यात आला. या प्रकरणी विशाल भीकन कोपरे (वय २७, रा. पवारवाडी, नाशिक रोड) याला अटक करण्यात आली आहे.