Nashik: सुट्ट्यांमुळे रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी! सुट्यांमुळे नाशिक रोडला फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची मोहीम

The rush of passengers to travel due to holidays at the railway station
The rush of passengers to travel due to holidays at the railway stationesakal

Nashik : सध्या सलग सुट्ट्या त्यातच शाळांना सुट्टी लागल्याने प्रत्येकाला गावाकडे जायचे वेध लागले असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनानिमित्त भारतभर फिरण्यासाठी कुटुंब तयारी करतात.

महिनाअखेर त्यातच सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडायला लागले असून नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील फलाटांवर रविवारी (ता. ३०) गर्दी पाहायला मिळाली. (railway station crowded Railway campaign on free passengers on Nashik road due to holidays nashik news)

नाशिक रोड रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवासी दंड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर रोज तिकीट तपासणी होताना दिसत आहे. मे महिन्याला सुरवात झालेली असून तीन दिवस सलग सुट्ट्यांमुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दी केली आहे.

गावाकडे जाण्याबरोबरच धार्मिक स्थळे यांना भेटी देण्यासाठी पर्यटक बाहेर पडायला लागले आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील चारही प्लॅटफॉर्मवर अवजड बॅंगासह गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The rush of passengers to travel due to holidays at the railway station
Nashik News : तिच्यासाठी डॉक्टरच ठरले देवदूत! बाळ दगावले, माता सुखरूप

तसेच, शाळांची सुट्टी सुरू झाल्याने गावी जाणाऱ्यांचे संख्येत मोठी वाढ झालेली आहे. शिवाय अनेक प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळाले नसल्याने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम जोरात सुरू आहे.

तिकीट तपासणीस सध्या फुकट्यांना दंड करीत आहे. गर्दीमुळे रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांसह उपाहारगृहे, हॉटेल्स यांची उलाढाल वाढली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील पैठणी विक्री केंद्र खादी विक्री केंद्रालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

The rush of passengers to travel due to holidays at the railway station
Unseasonal Rain : बागलाण तालुक्यात अवकाळीचा पुन्हा धुडगूस; ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com