Nashik Road Railway Station
sakal
नाशिक रोड: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी विभागीय शाखा अधिकाऱ्यांसह देवळाली व नाशिक रेल्वेस्थानकांची सखोल तपासणी केली. या तपासणीत स्थानकांची स्वच्छता, प्रवासी सुविधा, रेल्वे मार्गांची तांत्रिक स्थिती तसेच एकूणच कार्यक्षम तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.