काळाराम मंदिरात झिरपतेय पावसाचे पाणी; कराव्यात उपाययोजना

A layer of white paint has risen to the top of the temple due to water seepage.
A layer of white paint has risen to the top of the temple due to water seepage.esakal
Updated on

पंचवटी/ नाशिक : काळाराम मंदिर (Kalaram Temple) हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय तीर्थस्थान असल्यामुळे नाशिकला येणारे भाविक पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी येतात. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर पर्यटकांच्या दृष्टीनेही आकर्षण आहे.

या मंदिरात गेल्या तीन- चार वर्षांपासून पाणी झिरपू लागले आहे. त्याचे ओघळ मंदिराच्या आतील भागातून खाली येत आहेत. मंदिराच्या बांधकामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर बाब असल्याने पाणी झिरपू नये, यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. (Rain water seeping into Kalaram temple nashik monsoon Latest Marathi News)

पूर्वाभिमुख असलेल्या काळाराम मंदिरात तीन दालने आहेत. पहिल्या दालनात घंटा, दुसऱ्या दालनात पूर्व, उत्तर व दक्षिण असे तीन दरवाजे आहेत. तिसऱ्या दालनात गाभारा आहे. गाभारा आणि दुसरे दालन यांच्यामधील बांधकामावर पावसाचे पाणी झिरपत खाली येत आहे.

काही ठिकाणी झिरपलेल्या पाण्याने बांधकामावर पांढऱ्या रंगाच थर दिसत आहे. या अगोदर कितीही जोराचा पाऊस पडला तरी अशा प्रकारे पाणी झिरपत नव्हते. दगडी बांधकामातून झिरपणारे पाणी रोखण्यासाठी कायमस्वरूपाची उपाययोजना पावसाळ्यानंतरच करता येणार आहे.

त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात झिरपणारे पाणी रोखणे गरजेचे आहे. मंदिरावर काही वृक्षांची रोपेही वाढत असल्याचे दिसत आहे. तेही काढणे गरजेचे आहे.

A layer of white paint has risen to the top of the temple due to water seepage.
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर

हल्लीच्या नयनरम्य असलेले हे मंदिराच्या जागी पूर्वी लहानसे लाकडी मंदिर होते. त्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित होत्या. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्ला मसलतीने बांधले.

मंदिराचे बांधकाम इ. स. १७८० ला सुरू झाले व इ. स. १७९२ च्या सुमारास पूर्ण झाले. या बांधकामाला तेव्हा अंदाजे २३ लाख रुपये खर्च आला होता. इ. स. २००३ साली मंदिराचे पॉलीश, सुशोभीकरण व आवारातील दगडी नवीन फरशा बसवून मंदिरास भव्य स्वरूप दिले आहे.

या जीर्णोद्धारास सुमारे दोन कोटी रुपये खर्च आला असल्याचा उल्लेख मंदिराच्या आवारात श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे लावण्यात आलेल्या फलकावर करण्यात आलेला आहे.

"शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून काळाराम मंदिराचे बांधकामाकडे बघितले जाते. २००३ साली मंदिराचे पॉलीश करण्यासाठी सॅण्ड प्रेशरचा वापर करण्यात आला. त्याच्यामुळे मंदिराच्या वरच्या बाजूवर त्याचा हळूहळू परिणाम होऊन, गेल्या काही वर्षांपासून मंदिरात पाणी झिरपत आहे. त्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान पावसाळ्यात मंदिरात पाणी झिरपू नये यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे." - मंदार जानोरकर, विश्वस्त, काळाराम संस्थान

A layer of white paint has risen to the top of the temple due to water seepage.
महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com