Nashik Rain News : शहरात सायंकाळी वरुणराजा बरसला!; दिवसभर उकाडा, सायंकाळनंतर वातावरणात गारवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain in winter

Nashik Rain News : शहरात सायंकाळी वरुणराजा बरसला!; दिवसभर उकाडा, सायंकाळनंतर वातावरणात गारवा

नाशिक : दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्‍यानंतर बुधवारी (ता. १४) सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास शहरासह उपनगरी भागात जोरदार पाऊस बरसला. अचानक झालेल्‍या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दरम्‍यान, दिवसभर उकाडा जाणवल्‍यानंतर सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (rained in city in evening Warm throughout day Nashik Rain News)

हवामान खात्‍याने उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. दुपारनंतर पावसाचे वातावरण झालेले असताना, साडेपाचच्‍या सुमारास पावसाला सुरवात झाली. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे तासभर जोरदार पाऊस बरसला. पावसाच्‍या हजेरीमुळे सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

किमान तापमान २० अंशांवर, ४.५ मिलिमीटर पावसाची नोंद

गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणीय बदलाचा तापमानावर झालेला आहे. बुधवारी नाशिकचे किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअसवर पोचले होते. तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. दुसरीकडे ४.५ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी पारा दहा अंश सेल्सिअसखाली पोचले असताना, अचानक तापमानात वाढ झालेली आहे. बुधवारी सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाल्‍याने पारा पुन्‍हा घसरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: Nashik Health Camps : जिल्हयात आजपासून महाआरोग्य शिबिरे

टॅग्स :NashikrainWinter