Monsoon : पावसाची ओढ... चाऱ्याची धास्ती! उत्तर महाराष्ट्रातील ७७ लाख जनावरांसमोर चारा-पाण्याचे संकट

मॉन्सूनने यंदा अपेक्षित हजेरी लावली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह पशुपालकांची चिंता वाढू लागली आहे.
monsoon

monsoon

esakal

Updated on

नाशिक - मॉन्सूनने यंदा अपेक्षित हजेरी लावली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह पशुपालकांची चिंता वाढू लागली आहे. खरीप हंगामावर परिणाम झाल्यानंतर आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत ७७ लाख २३ हजार ८५ जनावरे असून, त्यांच्यासाठी सध्या ८२ लाख ५६ हजार २२० टन चारा उपलब्ध आहे. हा साठा सरासरी अडीच ते तीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com