लासलगाव- यंदा नाशिक जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात किमान पन्नास टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांना अनुदान द्यावे अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे. यंदा अर्ली द्राक्षाचे उत्पन्नावर पावसामुळे परिणाम झाल्याने उत्पन्न घटले, मात्र नंतरचा हंगाम चांगला येत गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांना द्राक्ष दिल्याने नेहमी होणारी गळ कमी झाल्याचाही हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.