नाशिक/इगतपुरी शहर- मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत युती होईल की नाही, यावर स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले. ‘युतीचा निर्णय तत्काळ घेतला जात नाही, त्यासाठी थोडा वेळ लागतो,’ असे सांगत त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला.