नाशिक/इगतपुरी शहर- युतीच्या चर्चा तडकाफडकी निर्णय घेऊन होत नाहीत, त्याला वेळ द्यावा लागतो, असे वक्तव्य करीत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीसंदर्भात गूढ निर्माण करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे युतीसंदर्भात मनोगत जाणून घेतले. त्यानंतर माझ्यावर सोडा, सर्व मनासारखे होईल, असे सांगत त्यांनी युतीसाठी इच्छुक असलेल्या बहुसंख्य मनसे पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला.