नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. पक्षातर्फे सोमवार (ता. १४)पासून इगतपुरीत राज्यस्तरीय शिबिर होत असून, पक्षप्रमुख राज ठाकरे या वेळी कोणती भूमिका मांडणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुका घोषित झालेल्या नसल्या तरी मनसेने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. इगतपुरीमध्ये पक्षाचे सोमवार (ता. १४) ते बुधवार (ता. १६) असे तीनदिवसीय शिबिर होणार आहे.