नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. तोच धागा पकडून मनसेच्या स्थानिक नेत्यांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयात शिक्षण उपसंचालकांना राज ठाकरे यांचे पत्र सादर केले. त्यात शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांविरोधात शाळांनी सतर्क, जागरूक राहावे, असे आवाहन केले आहे.