खासदार वाजेंचे नाशिकरोड स्वागत

खासदार वाजेंचे नाशिकरोड स्वागत
Published on: 
३२१६९ नाशिक : संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व करून परतलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्वागत करताना कार्यकर्ते. ------------ खासदार राजाभाऊ वाजेंचे नाशिक रोडला स्वागत सकाळ वृत्तसेवा नाशिक, नाशिक रोड, ता. १३ : संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या आमसभेत भारतीय संसदीय शिष्टमंडळात भारताचे प्रतिनिधित्व करून खासदार राजाभाऊ वाजे मंगळवारी (ता. १३) नाशिकमध्ये परतले. न्यूयॉर्क येथील दौरा आटोपून परतलेल्या वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले.भारताच्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्रातून निवड झालेले वाजे हे एकमेव खासदार होते. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी सामाजिक विकास, शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या तृतीय समितीतील सामाजिक विकासावरील चर्चेत वाजे यांनी डिजिटल व आर्थिक समावेशन, अन्नसुरक्षा, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांचा आढावा घेतला. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणा आणि विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी करण्याबाबतच्या चर्चेतही त्यांनी भूमिका मांडली. स्वागत समारंभानंतर बोलताना खासदार वाजे म्हणाले, जागतिक व्यासपीठावर काम करताना माझे लक्ष नाशिक जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीकडे होते. आता माझे प्राधान्य पाणीटंचाईचे संकट आणि दुष्काळाच्या आव्हानांवर असेल. शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी, गावांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा मी पाठपुरावा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com