
Society Election| राजापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध
येवला (जि. नाशिक) : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या राजापूर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे राजकारण निवडणुकीपूर्वीच विक्रमी अर्ज दाखल झाल्याने तापले होते. मात्र आमदार किशोर दराडे यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांचा समतोल साधत कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याने ही निवडणूक अखेर बिनविरोध झाली.
ग्रामपंचायतीप्रमाणेच सोसायटीची निवडणूकही येथे लक्षवेधी असते. गावांतर्गत दोन प्रबळ गट असून, ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) चुरशीची झाली आहे. राजापूर म्हणजे आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांचे गाव अशी ओळख आहे. अर्थात, स्थानिक राजकारणापासून ते अलिप्त असतात. मात्र या वेळी जिल्हा बँकेचे संचालक या नात्याने त्यांनी बेरजेच्या राजकारणातून मध्यस्थी केल्याने सहमती होत निवडणूक बिनविरोध झाली. माजी सरपंच परशराम दराडे, माजी सरपंच रमेश वाघ, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दिनेश आव्हाड, पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड,
हेही वाचा: नाशिक : लांडगा सदृश्य जनावराचा हल्ला; ७ जण जखमी
माजी सरपंच प्रमोद बोडके यांचे दोन पॅनल असून, ग्रामपंचायत निवडणूक या दोन्ही गटांत चुरशीची झाली होती. आताही १३ जागांसाठी दोन्ही गटांच्या तब्बल ५४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे बिनविरोध तर दूरच; पण निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता होती. माघारीच्या अंतिम टप्प्यात आमदार दराडे बंधूंनी सगळ्यांना विश्वासात घेऊन व बैठका घेत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मध्यस्थी केली. दोन्ही पॅनल प्रमुखांनी ठरविलेल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, इतरांची मनधरणी करण्यात नेत्यांना यश आले. त्यामुळे १३ जण रिंगणात राहिल्याने बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा: लोधाई माता टेकडीवर शेतकऱ्यांच्या पुढाकाराने कृत्रिम पाणवठे
यांची लागली वर्णी
दोन्ही पनलचे सहा-सहा असे बारा व दराडे बंधूंच्या कुटुंबातील एक अशा १३ जणांची बिनविरोध निवड झाली.
संचालकपदी सर्वसाधारण कर्जदार गटातून हनीफ सय्यद, मच्छिंद्र चव्हाण, मुरलीधर वाघ, दिनेश आव्हाड, पोपट अलगट, प्रमोद बोडके, विनायक भाबड, भीमा वाघ, एनटी (NT) गट- परसराम दराडे, ओबीसी (OBC) गट- भाऊसाहेब आगवण, एस. सी. गट- प्रमोद गांगुर्डे, महिला प्रतिनिधी- आशा दराडे, बेबी मुंढे यांची बिनविरोध निवड झाली.
Web Title: Rajapur Society Election Unopposed Mediation Of Kishor Darade Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..