ओझरता- कसबे सुकेणे येथे एकास मागील कुरापत काढून दोन व्यक्तींनी मारहाण केली. कौटुंबिक भांडणाची कुरापत काढुन राजाराम कोपटे यांना वाईटसाईट शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार राजाराम कोपटे यांनी ओझर पोलिस ठाण्यात नोंदविली.