राजारामनगरात समस्यांचा विळखा; वाढीव वस्तीत मूलभूत सुविधांचा अभाव

राजारामनगरात समस्यांचा विळखा; वाढीव वस्तीत मूलभूत सुविधांचा अभाव
Published on: 
टुडे पान ४ : मेन फिचर लोगो : नव्या वस्त्या; जुन्याच समस्या NSK26H31397 जळगाव : घंटागाडी येत नसल्याने मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा. ------------- NSK26H31398 गटारीचे सांडपाणी जाण्यासाठी जागा नसल्याने खुल्या जागेत सोडलेले सांडपाणी. ------------ NSK26H31399 राजाराम नगरातील कच्चा रस्ता. ------------ NSK26H31400 खुल्या भुखंडावर सांडपाणी साचल्याने वाढलेले गवत. --- शीर्षक राजारामनगर परिसरात कचऱ्याचे ढीग, घंटागाड्या फिरकेना समस्यांचा विळखा; तुंबलेल्या गटारी, मोकळ्या भूखंडांवरील सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.५ : शहरातील वाढीव वस्ती असलेल्या राजारामनगर परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव जाणवत असून, विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारींची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने सांडपाणी तुंबून दुर्गंधी निर्माण होत आहे. काही मोकळ्या भूखंडांमध्ये सांडपाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजारामनगरातील वाढीव वस्तीमध्ये लोकसंख्या वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधांचा विस्तार झालेला नाही. परिसरातील काही भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत टाकावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. कचऱ्यात भटक्या जनावरांचा वावर वाढल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. सांडपाणी रस्त्यावर परिसरातील अनेक गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने गाळ व कचरा साचला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून काही ठिकाणी सांडपाणी रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत साचत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. सांडपाणी मोकळ्या भूखंडांत वाढीव वस्तीतील काही मोकळे भूखंड सांडपाणी साचण्याचे ठिकाण बनले आहेत. या भूखंडांमध्ये पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. पावसाळ्यानंतरही पाण्याचा निचरा न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चौकट नियमित स्वच्छता, घंटागाडीची मागणी परिसरातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करावी, गटारींची नियमित साफसफाई करावी, मोकळ्या भूखंडांमध्ये साचणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी तसेच डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढीव वस्तीचा नियोजनबद्ध विकास करून रस्ते, गटारी, पाणी निचरा आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. नागरिकांच्या अपेक्षा नियमित घंटागाडी सुरू करावी कचऱ्याचे ढीग तातडीने हटवावेत गटारींची नियमित साफसफाई करावी मोकळ्या भूखंडांतील सांडपाण्याचा निचरा करावा डास प्रतिबंधक फवारणी करावी वाढीव वस्तीत मूलभूत नागरी सुविधांचा विस्तार करावा कोट राजारामनगरातील वाढीव वस्तीत कचरा संकलन, गटारींची स्वच्छता आणि सांडपाण्याचा निचरा या समस्या वारंवार निर्माण होत आहेत. घंटागाडी नियमित सुरू करून गटारींची साफसफाई व डास प्रतिबंधक फवारणी तातडीने करावी. मूलभूत सुविधांसाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. - रावन ठाकरे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com