मालेगाव शहर: मराठा सेवा संघ प्रणित राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषदेचे राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिक येथे होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेत प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रसाद सोनवणे यांनी अधिवेशनाच्या नियोजनाविषयी निमंत्रण दिले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘मविप्र’चे रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे अधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.