Rajendra Pawar
sakal
इगतपुरी: अडसरे खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र अशोक पवार यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) आणि कृषी जागरणतर्फे नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नवी दिल्ली येथील पुसा कॅम्पसमध्ये झालेल्या सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.