फोटो : NSK26H34020
खैरवे : राजमाता जिजाऊ बसचे स्वागत करताना ग्रामस्थ.
------------------
खैरवे येथून राजमाता जिजाऊ बस सुरू
ग्रामस्थांकडून स्वागत; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. ३१ : राज्य परिवहन महामंडळातर्फे ग्रामीण भागात आरामदायी प्रवासासाठी शहादा आगारात नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. खैरवे (ता. शहादा) येथे मुक्कामी आलेल्या बसचे पूजन करून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
शहादा आगारातून ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू होत्या. मात्र, अनेक बसची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात वारंवार बिघाड होणे, खिडक्या- दरवाजे तुटलेले, पत्रा निखळेला- तुटलेला असणे अशा बस ग्रामीण भागात पाठविल्या जात होत्या. विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत होता. बस खराब पाठविली जात असल्याने रस्त्यावर बंद पडली. तर विद्यार्थी, प्रवाशांना रस्त्यांवर उतरावे लागत होते. परिवहन मंडळाची दखल घेऊन सर्वसोयींनी युक्त असलेल्या १५ राजमाता जिजाऊ बस शहादा आगारात दाखल झाल्या आहेत. खैरवे येथे मुक्कामी गेलेल्या बसचे पूजन पं. स.च्या माजी सदस्या चंदनबाई पानपाटील यांच्या हस्ते करुन चालक- वाहकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी सरपंच डॉ. उमेश पाटील, ग्रा. पं. सदस्य दिलीप गिरासे, निवृत्त उपनिरिक्षक ईश्वर निकुंबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश पाटील, मल्हारी चित्ते, संजय पानपाटील, रणजित गिरासे, पोलिस पाटील धनराज पानपाटील, पंडीत गवळे, अशोक बैसाणे, सुनील मुसळदे, पंडीत कोळी आदी उपस्थित होते.