Ironman Success Story: रजनीश गायकवाड याचे आयर्नमॅन स्पर्धेत यश

Rajneesh Gaikwad
Rajneesh Gaikwadesakal

Ironman Competition : जागतिक स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचा युवा खेळाडू रजनीश गायकवाड याने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्याने १३ तास ४७ मिनिटांची वेळ नोंदवत ही स्पर्धा पूर्ण केली.

नूर सुलतान, कझाकस्तान येथे रविवारी (ता.२) झालेल्या या स्पर्धेत ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किमी धावणे हे अंतर न थांबता १७ तासांच्या आत पूर्ण करायचे असते. (Rajnish Gaikwad success in Ironman competition nashik)

Rajneesh Gaikwad
MPSC Success Story: छोट्या गावातला इंजिनिअर झाला पहिला फौजदार!

प्रचंड शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या आयर्नमॅन स्पर्धेला जागतिक स्तरावरील सर्वात कठीण एक दिवसीय स्पर्धा असे म्हणतात. रजनीश गायकवाड याने भारताचे प्रतिनिधित्व करत चांगले यश मिळवले.

त्यामुळे नाशिकचे नाव ट्रायथलॉन स्पर्धेत उंचावले आहे. संमोहनतज्ञ व समुपदेशक डॉ. शैलेंद्र गायकवाड व डॉ. मीनल गायकवाड यांचे पुत्र रजनीश याने आयर्नमॅन स्पर्धेत उतरण्याची प्रेरणा आयर्नमॅन डॉ. रवींद्र कुमार सिंगल, आयर्नमॅन विजय काकड यांच्याकडून घेतली.

वडील डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्यासोबत सराव करताना रजनीशला आयर्नमॅन अश्विनी देवरे आणि डॉ. मनीषा रौंदळ यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. सरावातील कमालीचे सातत्य, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर रजनीशने हे मोठे यश प्राप्त करून नाशिक शहराचा व देशाचा नाव लौकिक उंचावला आहे.

Rajneesh Gaikwad
PSI Success Story: MPSCच्या पहिल्या प्रयत्नात रोहितची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com