Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Balnatya Spardha

Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

नाशिक : चतुर्थ महाराष्ट्र राज्य दिव्यांग स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाशिकमधील महाराष्ट्र समाजसेवा संघ रचना विद्यालय या संस्थेच्या ‘रिले’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

.रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्ट, गोरेगाव या संस्थेच्या गोदा या नाटकास द्वितीय, तर राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड, सोलापूर या संस्थेच्या ‘जत्रा’ या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाले. (Rajya Balnatya Spardha Relay of Nashik first in childrens drama competition nashik news)

स्पर्धेची अंतिम फेरी पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे १५ ते १७ मार्च यादरम्यान झाली. स्पर्धेत ११ नाट्यप्रयोग सादर झाले. त्यात धनंजय वाबळे यांचे नाटक ‘रिले’, जयेश जोशी यांचे ‘नाटकवारी’, अनिकेत भोईर यांचे नाटक गोदा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.

प्रकाश योजनेसाठी कृतार्थ कन्सारा, (रिले), भरत मोरे (गोदा) यांना पारितोषिक जाहीर झाले. नेपथ्यमध्ये सुचिता महाले (वनराई), कनिष्क बिजवे (आजोबा आणि लाल टी-शर्ट), रंगभूषेसाठी विनोद देवठक (वनराई), मीनाक्षी बावल (रिले), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष अखिलेख यादव (गोदा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री क्षितिजा भावसार (रिले), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे एन्जल गुप्ता (गोदा), ऋतुजा देसले (रिले), सलोनी लांडे (आजोबा आणि लाल टी-शर्ट), लकी (विधी), ईश्वर कळंगुंडे (जत्रा), समर्थ डाके (रिले), ओम सूर्यवंशी (वनराई), करण पवार (देवा तुझे किती सुंदर आकाश) यांना पारितोषिके जाहीर झाली.

स्पर्धेत परीक्षक म्हणून गिरीश भुतकर, वैशाली गोस्वामी, मंगेश दिवाणजी यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले.