NSK26H34751
कोथळी (ता. मुक्ताईनगर) : आदिवासी पाड्यावर रविवारी बालकाला मिठाई खाऊ घालताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे.
---
मंत्री रक्षा खडसेंची शेतमजूर बांधवांसोबत दिवाळी
उपशीर्षक
कोथळीत आदिवासी पाड्यावर फराळवाटप; शेतकऱ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
मुक्ताईनगर, ता. ८ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी (ता. ८) कोथळी येथील आदिवासी पाड्याला सदिच्छा भेट दिली. त्यांनी अत्यंत साधेपणाने शेतमजूर बांधवांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.
दुष्काळी परिस्थितीच्या सावटाखाली असतानाही, यंदाची दिवाळी काही घटकांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरली आहे. सणासुदीच्या दिवसांतही दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या छायेत असलेल्या आदिवासी पाड्यावर रक्षा खडसे स्वतः पोहोचल्या. त्यांनी पाड्यातील नागरिकांच्या घरी, झोपड्यांवर जाऊन त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधला. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांनी धीर दिला.
फराळवाटप अन् चेहऱ्यावर हास्य
या भेटीदरम्यान रक्षा खडसे यांनी शेतमजूर बांधव आणि त्यांच्या लहान मुलांना स्वतःच्या हाताने दिवाळीचा फराळवाटप केला. संकटकाळात देशाच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी आपल्या पाड्यावर येऊन दिवाळी साजरी करीत आहे, हे पाहून पाड्यातील नागरिकांच्या आणि विशेषतः चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
लोकप्रतिनिधीने थेट शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या दारी जात त्यांच्यासोबत सण साजरा केल्याने कोथळीच्या आदिवासी पाड्यावर यंदाची दिवाळी एका वेगळ्याच आपुलकीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. ग्रामस्थांनीही या संवेदनशील भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.