Rally of Maharashtra
sakal
नाशिक
Rally of Maharashtra 2026 : नाशिकमध्ये 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा थरार! मस्कारेहास डीन विजयाचा प्रबळ दावेदार, तर आदित्य ठाकूर स्पर्धेतून बाद
Mascarenhas–Karubaiah Extend Dominant Lead : सहाव्या फेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मंगळूरच्या मस्कारेहास डीन-करुबाह गगन (टीएसआय रेसिंग) जोडीने विजेतेपदाकडे घोडदौड सुरू ठेवली. रविवारी (ता. १) विजेतेपदाच्या घोषणेची औपचारिकता पूर्ण केली जाईल.
नाशिक: ‘रॅली ऑफ महाराष्ट्र’च्या सहाव्या फेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मंगळूरच्या मस्कारेहास डीन-करुबाह गगन (टीएसआय रेसिंग) जोडीने विजेतेपदाकडे घोडदौड सुरू ठेवली. रविवारी (ता. १) विजेतेपदाच्या घोषणेची औपचारिकता पूर्ण केली जाईल. उपविजेतेपदाचा दावेदार आदित्य ठाकूर-विजेंदर कश्यप जोडीची कार रस्त्यावरून उतरून झालेल्या अपघातामुळे ते स्पर्धेतून बाद झाले. यामुळे कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडीचा उपविजेतेपदावर दावा वाढला.
