७१ वर्षांची रामलीलेची परंपरा; श्रीरामांच्या आदर्शांची गाथा रंगणार !

७१ वर्षांची रामलीलेची परंपरा; श्रीरामांच्या आदर्शांची गाथा रंगणार !
Published on: 
04986 डीजीपीनगर : रामलीला महोत्सवाचा प्रारंभाप्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, श्‍याम दुबे, कपिलदेव शर्मा, राहुल दिवे, आशाताई तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे आदी. ऐतिहासिक रामलीला महोत्सवाला प्रारंभ सकाळ वृत्तसेवा डीजीपी नगर, ता. १३ : सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय सांगणारी प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची गाथा... रामायणातील जिवंत प्रसंग, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि रावणदहनाचा थरार! अशा भक्तिमय वातावरणात गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलीला महोत्सवाला मंगळवारी (ता.१३) उत्साहात प्रारंभ झाला. ७१ वर्षांची परंपरा जपणारा हा महोत्सव नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालत आहे. या प्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, नाशिक प्रेसचे प्रबंधक श्‍याम दुबे, महासचिव कपिलदेव शर्मा, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशाताई तडवी, पूजाताई नवले, ज्योतीताई जोंधळे, डॉ. अशोक उबाळे, वंदना मनचंदा, पप्पू कोहली, किमया बागुल, संजय लोळगे, अभियंता शिवम पाटील, अनिल जोंधळे, शुभम परदेशी उपस्थित होते. गणेशवंदना आणि फटाक्यांच्या आतषबाजीत रामलीलेस प्रारंभ झाला. ------ नोकरी सांभाळून कलेची साधना! मुद्रणालयातील नोकरी सांभाळत कलाकार दोन महिने दररोज सात ते आठ तास सराव करतात. रामाच्या भूमिकेत सचिन दलाल, सीतेच्या भूमिकेत पायल शर्मा, तर रावणाच्या भूमिकेत ज्ञानेश्वर कुंडारिया दिसणार आहेत. दिग्दर्शक प्रदीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली रामायणातील विविध प्रसंग साकारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com