Ram Navami 2023 : पिंपळगावमध्ये द्राक्षांचा प्रसाद श्रीरामाच्या चरणी; रामरथ मिरवणुकीला अश्वाची सलामी

Pimpalgaon Baswant-Ram Ram Procession started with horse salute. In the second picture, Sarpanch Bhaskarrao Bankar, Satish More, Bapusaheb Patil etc. are pulling the chariot.
Pimpalgaon Baswant-Ram Ram Procession started with horse salute. In the second picture, Sarpanch Bhaskarrao Bankar, Satish More, Bapusaheb Patil etc. are pulling the chariot.esakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : नटलेले, सजलेले श्रीरामाचे मंदिर, शहरासह परिसरातून आलेले हजारो भाविक व प्रभुरामचंद्राचा गगनस्पर्शी जयजयकाराने पिंपळगाव शहरात राम भक्तीची लाट उसळली.

भाविकांच्या मुखी श्रीरामाचा निरंतर घोष सुरू होता. दुपारी बाराला मुख्य रामजन्मोत्सव सोहळा व सायंकाळी ऐतिहासिक रथ मिरवणुकीत सिंहावर रामचंद्र की जय...च्या जयघोषाने उत्साह टिपेला पोचला. परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षांचा प्रसाद श्रीरामच्या चरणी अर्पण केला. (Ram Navami 2023 Prasad of grapes at Lord Rams in Pimpalgaon Horse Salute to Ramrath Procession nashik news)

पाराशरी नदी तीरावरील श्रीराम मंदिराची विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळी कावड मिरवणुकीचा कार्यक्रम झाला. रामजन्मोत्सव सोहळ्यासाठी रामभक्तांच्या गर्दीने परिसर फुलून गेला.

‘राम जन्मला गं सखे’...हा पाळणा गीत गाऊन महिला भाविकांनी रामजन्मोत्सवाला सुरवात केली. श्रीराम जयराम जयजय राम... च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. भजनाच्या तालावर ठेका धरून भाविक यावेळी रामनामात तल्लीन झाले. जन्मोत्सवानंतर दर्शनासाठी भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Pimpalgaon Baswant-Ram Ram Procession started with horse salute. In the second picture, Sarpanch Bhaskarrao Bankar, Satish More, Bapusaheb Patil etc. are pulling the chariot.
Bridge Game : ‘ब्रीज’ खेळास महाविद्यालय स्तरावर मान्यता! : आनंद सामंत

रथ मिरवणुक ठरली लक्षवेधी

वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या पिंपळगावच्या रामरथ मिरवणुकीला सायंकाळी श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. सरपंच भास्करराव बनकर, भाजपचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, योगेश महाराज गवारे, विनायक खोडे, किरण लभडे आदींसह ग्रामपंचायत सदस्य मान्यवरांच्या हस्ते रथाला प्रारंभ करण्यात आला.

आकर्षक फुलांनी रथाची सजावट करण्यात आली. अश्‍वाची जोरदार सलामी झाली. ढोल पथक, बोहडा पथक, आदिवासी नृत्य पथक, भगवे ध्वज यामुळे मिरवणुकीचा उत्साह अधिकच उंचावर गेला. ढोलताशाच्या तालावर भक्तांनी यावेळी ठेका धरला. मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेत रथ ओढून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुस्लिम मोहल्ला, वेश, मेनरोड मार्गे मिरवणूक निफाड फाट्यावर पोचताच जय श्रीरामचा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला. रथमिरवणूक मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली. चौकाचौकात रांगोळी काढून रथाचे दर्शन महिलांनी घेतले. जुन्या महामार्गाने श्रीराम मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली.

Pimpalgaon Baswant-Ram Ram Procession started with horse salute. In the second picture, Sarpanch Bhaskarrao Bankar, Satish More, Bapusaheb Patil etc. are pulling the chariot.
Nashik News : वणी ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाख! कराच्या रूपाने मिळणार महसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com