जुने नाशिक- रमजान ईद शहरात उत्साहात साजरी झाली. पारंपरिक शहाजानी ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) येथे शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब यांच्या नेतृत्वात ईदची सामुदायिक विशेष नमाजपठण करण्यात आली. समाजात एकोपा आणि सुख- शांती नांदो, प्रत्येक संकटातून मुक्ती मिळो, देशाची उन्नती होवो, अशी दुवा करण्यात आली.