Ramadan Eid Festival : मालेगावला रमजान ईद खरेदीची धूम; कापड बाजारात दररोज लाखोंची उलाढाल

Crowd of Muslim brothers for Eid shopping
Crowd of Muslim brothers for Eid shoppingesakal

Ramadan Eid Festival : मुस्लीम बांधवांचे रमजान पर्वातील १७ रोजे संपले आहेत. त्यामुळे ईदच्या खरेदीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. शहरात ईदच्या खरेदीची धूम सुरु आहे. विशेषत: कापड बाजारात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

येथील टेलर व्यावसायिकांच्या दुकानाबाहेर हाऊसफुल्लचे फलक लागले आहेत. त्यामुळे तयार कपडे खरेदीकडे बहुतांश नागरिकांचा कल दिसून येत आहे. लॉटने मिळणाऱ्या वस्तु खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.

नागरिक खरेदीसाठी रात्री बाहेर पडत असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील पूर्व भागातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. (Ramadan Eid festival shopping spree in Malegaon Daily turnover of lakhs in textile market nashik news)

रमजान पर्व सुरु झाल्यापासून मुस्लीम बहुल असलेल्या शहरातील पूर्व भागाची दिनचर्या पूर्णपणे बदलली आहे. पहाटेपासूनच या भागात वर्दळ सुरु होते. दुकाने सकाळी अकरा नंतरच उघडत आहे.

रमजान ईद जवळ येत असल्याने नागरिकांनी खरेदीला सुरवात केली आहे. रात्री उपवास सुटल्यानंतर नागरिक कुटुंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.

विशेषत: येथील कापड बाजार गजबजून गेला आहे. रमजाननिमित्त कपड्यांची शेकडो दुकाने लागली आहेत. येथील किदवाई रोड खरेदीचे मुख्य केंद्र आहे. याशिवाय गांधी मार्केटमध्ये देखील रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

टेलर व्यावसायिकांकडे ईदचे कपडे शिवण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तयार कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crowd of Muslim brothers for Eid shopping
Ramzan Festival : गांधी कपडा मार्केट बनले रमजानच्या खरेदीचे केंद्र! खरेदीसाठी महिलांची रेलचेल

येथे शर्ट, टी शर्ट, पॅन्ट लॉटने मिळत आहेत. पाचशे रुपयांपर्यंत तयार ड्रेस मिळत असल्याने गरिबांचा ओढा लॉटच्या कपड्यांकडे दिसून येत आहे. गांधी मार्केट, पवारवाडी भागातील महिलांसाठी असलेल्या विशेष बाजारात कपडे, सौंदर्य प्रसाधने, मेहंदी आदींच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

ईदच्या बोनसनंतर खरेदी वाढेल

कपड्यांपाठोपाठ चप्पल, बूट विक्रीतून शहरात रोज मोठी उलाढाल होत आहे. दोनशे ते अडीचशे रुपये दरम्यान मिळणाऱ्या कापडी बुटांना प्रचंड मागणी आहे. कंबरेचे बेल्ट, बनियन, अंडरवेअर, रुमाल, टोपी विक्रीची दुकाने हातगाड्यांवर सर्वत्र लावण्यात आली आहेत.

रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात खरेदीला आणखी वेग येईल. आठ दिवसानंतर रमजानच्या बोनस वाटपाला सुरवात होणार आहे. येथील यंत्रमाग, पाइप कारखाने तसेच खासगी आस्थापनांवरील कामगारांना ईदला बोनस दिला जातो.

Crowd of Muslim brothers for Eid shopping
Ramzan Festival: विशेष बाजारांची सामान्यांना भुरळ; मालेगावला रमजानानिमित्त दररोज लाखोची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com