Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा : रामदास आठवले

Ramdas athawale give support to Uniform Civil Code nashik news
Ramdas athawale give support to Uniform Civil Code nashik newsesakal

Uniform Civil Code : देशात समान नागरी कायदा असावा, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यामुळे माझ्या रिपब्लिकन पक्षाचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे.

मात्र, या कायद्याविषयी मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे. याबाबत मुस्लिमांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (Ramdas athawale give support to Uniform Civil Code nashik news)

भारतीय दलित पँथरच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी (ता. १०) श्री. आठवले यांच्यासह जुन्या पँथरच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने आठवले नाशिक दौऱ्यावर होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य कार्यकारिणीचे श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे उपस्थित होते.

श्री. आठवले म्हणाले, की समान नागरी कायदा असावा, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आज केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यादृष्टीने विचार करीत आहे. यात मुस्लिमांच्या मनात विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे.

मात्र देशासाठी समान नागरी कायदा गरजेचा असल्याने माझ्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे, असे सांगत त्यांनी पूर्वीच्या दलित पँथरच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

अजित पवारांचा निर्णय योग्यच

पँथरची बांधणी नव्याने करायची झाल्यास त्याचे स्वरूप कसे असावे, भूमिका काय असावी, या सगळ्याचा सांगोपांग विचार सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ramdas athawale give support to Uniform Civil Code nashik news
Ramdas Athawale : मंत्रीमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद हवे; रामदास आठवले यांची मागणी

केंद्रात भाजपसोबत ११ वर्षांपासून सत्तेत असून, केंद्रात एक मंत्रिपद मिळावे. भाजप सोबतच्या युतीत आधी एकनाथ शिंदेपाठोपाठ अजित पवार आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद वाढली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. पण अजित पवार यांचाच निर्णय योग्य आहे, असा दावाही त्यांनी केला. इंदूमिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.

मी शिर्डीतून इच्छुक

रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या दोन जागा, तर विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत मी स्वतः शिवसेनेच्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्या जागेवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहे, असेही ते म्हणाले. राज्यात प्रकाश आंबेडकर आणि माझा असे दोन मोठे गट एकत्र आले तरच रिपब्लिकन ऐक्याचा चेहरा पुढे येईल, असेही त्यांनी सांगितले.

Ramdas athawale give support to Uniform Civil Code nashik news
Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com