पोलिस चौकी व्हावी

पोलिस चौकी व्हावी
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी.............टुडे १ ला ही बातमी ॲडजेस्ट करावी......गोमास किंवा शैक्षणिक मुदतवाढ वा अन्य एखादी बातमी शिल्लक ठेवावी -- फोटो क्रमांक ः 31576 धुळे : विविध मागण्यांबाबत भाग्यश्री विसपुते यांना निवेदन देताना अनुप अग्रवाल, युवराज करनकाळ व सकल चर्मकार समाजाचे शिष्टमंडळ. -- रामदेवबाबानगरात पोलिस चौकी व्हावी - आमदार अग्रवाल : अत्याचार प्रकरणानंतर विविध मागण्या सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : शहरातील रामदेवबाबानगर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारावी. गंभीर अत्याचार प्रकरणातील संशयितांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह सकल चर्मकार समाजाने घेतली. याबाबत मंगळवारी (ता. ६) जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. रामदेवबाबानगर येथे २९ सप्टेंबरला महिलेवर अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र तयार करावे. सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी भूमिका आमदारांसह, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ व शिष्टमंडळाकडून मांडण्यात आली. परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली. परिसरातील पूर्वीच्या परिस्थितीमुळे भीतीपोटी काही नागरिकांनी कवडीमोल दराने घरे विकल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. या प्रकाराचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी रामदेवबाबानगर, मोहाडी, अरिहंत मंगल कार्यालय परिसर व देवपूर येथे नवीन पोलिस चौकी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. पीडितेला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अटक केलेल्या संशयितांनी यापूर्वी परिसरातील अन्य महिलांना त्रास दिला आहे का, ब्लॅकमेलिंग किंवा खंडणीचे प्रकार केले आहेत का, याची चौकशी करावी. पीडिता व तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तसेच आवश्यक कायदेशीर मदत द्यावी, अशी मागणी आमदारांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com