NPH26B08854
निफाड ः सहकारनेते रमेशचंद्र घुगे यांचा सत्कार करताना आमदार दिलीप बनकर, आमदार गोकूळ गिते, शंकरराव वाघ, हेमंत धात्रक, माणिकराव बोरस्ते, बापूसाहेब कुंदे, पंढरीनाथ थोरे, सतीश मोरे आदी.
३६-३
माणसे जीवंत असेपर्यतच नाते जपा, माफ करा
--------------
प्रा. गणेश शिंदे ः रमेशचंद्र घुगे यांनी पुढे नेला त्र्यंबकराव घुगे गुरुजींचा वारसा
-------------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.१२ ः आई वडील, चुलते, काका, बहीण, भाऊ, मावशी, ज्येष्ठ नागरिक अशा आपल्या आयुष्यातील नात्यांना जपण्याचा संदेश देताना माणूस एकदा काळाच्या पडद्याआड गेला, की त्यांचे पुन्हा दर्शन किंवा संवाद शक्य होत नाही, त्यामुळे माणसे असतानाच त्यांना जपा, गरज पडल्यास माफ करा अशी भावनिक साद प्रा. गणेश शिंदे यांनी घातली.
------------------
सहकार नेते तथा सहकारमहर्षी घुगे गुरुजी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र घुगे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. प्रा. शिंदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित हजारो श्रोत्यांना जीवनाचे महत्त्व पटवून देत मंत्रमुग्ध केले.
--------------
सहकार शिक्षण आणि सांस्कृतिक कौशल्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सहकारनेते रमेशचंद्र घुगे यांनी स्वर्गीय सहकारमहर्षी त्र्यंबकराव घुगे गुरुजी यांचा वारसा केवळ जपला नाही, तर तो अधिक सक्षमपणे पुढे नेत अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थांनी घेतलेली गरुडझेप ही निफाड तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार बनकर यांनी काढले.
रमेशचंद्र घुगे यांनी आयुष्याच्या जडणघडणीमागील प्रेरणास्थान उलगडताना स्वर्गीय घुगे गुरुजींचा आदर्श, त्यांनी दिलेली शिस्त आणि आईने घेतलेले अपार कष्ट यांनाच आपण जीवनाचा मूलमंत्र मानले. विविध संस्थांच्या माध्यमातून काम करताना गुरुजींचे विचार आणि आईचे संस्कार यांचीच शिदोरी उपयोगी पडल्याचे सांगितले.
आमदार गोकूळ गिते, भाजप माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष हेमंत धात्रक, मविप्र माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, नाशिक जिल्हा कांदा-बटाटा संघ अध्यक्ष बापूसाहेब कुंदे, पंढरीनाथ थोरे, पिंपळगावचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, शिवाजीराजे ढेपले, माधवराव गिते, युवा नेते वैकुंठ पाटील, निफाड वकील संघ उपाध्यक्ष ॲड. तुषार भानुवंशे, श्री माणकेश्वर वाचनालय अध्यक्ष मधुकर शेलार, सिद्धार्थ बनारसे आदींसह राजकीय, सामाजिक, सहकार, विधी, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.