सहकारातून समाजोन्नतीचा ध्यास : रमेशचंद्र घुगे

सहकारातून समाजोन्नतीचा ध्यास : रमेशचंद्र घुगे
Published on: 
सिन्नर पान २/ ॲंकर फोटो -NSK26H34580 सहकारातून समाजोन्नतीचा ध्यास : रमेशचंद्र घुगे -------------------------------------- निफाड तालुक्यातील कृषी, शिक्षण, सहकार व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या रमेशचंद्र घुगे यांचा गुरूवारी (ता.५) वाढदिवस साजरा झाला, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला धांडोळा... - माणिक देसाई, निफाड निफाड तालुक्यातील ओणे गावातून जिल्ह्याला सहकाराचा मूलमंत्र देणारे सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे अर्थात घुगे गुरुजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र रमेशचंद्र घुगे वाटचाल करीत आहेत. सहकार, कृषी, शिक्षण, राजकीय व सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या घुगे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सिद्धांतावर कार्य करताना वडिलांनी स्थापन केलेल्या नाशिक जिल्हा कांदा, बटाटा संघाच्या हिताची व प्रगतीची जबाबदारी घेतली. कधी संचालकपदावर तर आता चेअरमन पदावर कार्यरत असताना या संस्थेचा कसा चौफेर विकास होईल यावरच लक्ष केंद्रित केले. घुगे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर घुगे गुरुजी पतसंस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. जिल्हाभरात सात शाखांच्या माध्यमातून या संस्थेची घोडदौड सुरू असून निफाड या मध्यवर्ती प्रशासकीय शाखेच्या अतिरिक्त नाशिक रोड, नाशिक पंचवटी ,पालखेड मिरची, सायखेडा, विंचूर, म्हाळसाकोरे आदी ठिकाणी शाखा विस्तार केला आहे. १९०५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचा अवघ्या वीस वर्षात वटवृक्षात रूपांतर केल्याचे संस्थेच्या प्रगतीवरून लक्षात येते. संस्थेने हजारो बेरोजगार व व्यावसायिकांना कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना निफाडभूषण पुरस्कार दिला जातो. घुगे पतसंस्थेच्या माध्यमातून निफाड शेतकरी संघ स्थापन करून त्यामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात खते, बी बियाणे पुरविले जात आहेत. संस्थेच्या वतीने ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात इंग्रजी शाळा व मराठी शाळा तालुक्यात सुरू करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली. रमेशचंद्र घुगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला असून भाजपच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. (जाहिरात पुरस्कृत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.