Nashik Ramkal Path
sakal
नाशिक: राज्य सरकार आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सीतागुंफा ते रामतीर्थ या १.५ किलोमीटर टापूत होत असलेल्या रामकाल पथाच्या कामात काही मंदिरे, तसेच घरे हलवावी लागणार आहेत. मात्र, या ठिकाणी नवीन मंदिरेही उभी राहणार आहेत. सुशोभीकरणाच्या कामाचा आराखडा महापालिकेतर्फे करण्यात आलेला आहे, असे या कामाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.