रामतीर्थावर बंदोबस्ताची रंगीत तालीम

रामतीर्थावर बंदोबस्ताची रंगीत तालीम
Published on: 
मेन फोटो : H32450 रामतीर्थावर ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालीम पोलिस आयुक्तांकडून पाहणी : सुरक्षेचे कडेकोट नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक/पंचवटी, ता.१५ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबरला रामतीर्थावर होत असून, या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयाने गुरुवारी (ता. १५) बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्तासह नियोजनाच्या अनुषंगाने पाहणी केली. .. ध्वजारोहण सोहळा दुपारी बाराला आहे. तर सायंकाळी गोदाआरती केली जाणार आहे. दोन्ही सोहळ्यासाठी केंद्र व राज्य शासनातील मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या वेळी भाविकांची गर्दी होण्याचीही शक्यता आहे. ही बाब गृहित धरून सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी गोदाघाट परिसरासह रामतीर्थावर कडेकोट बंदोबस्तात रंगीत तालीम करण्यात आली. या वेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सहायक आयुक्त माधव रेड्डी, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात होता. ध्वजारोहण सोहळ्याची माहिती आयुक्त कर्णिक यांनी आयोजकांकडून घेतली. तसेच सध्या गोदाघाटावर सुरू असलेल्या रामकाल पथाच्या निर्मितीसह गोदाघाटाववरील कामांची माहिती आयुक्त कर्णिक यांनी केली. ध्वजारोहणांसाठी येणाऱ्या साधू मंहंतांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन होणार आहे. यासाठीच्या मार्गावर अडथळा येऊ नये त्यासाठी वाहतूक मार्गाचे नियोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करीत ते रस्ते त्या दिवशी बंद करण्यात येणार आहेत. तसेच, स्थानिकांना त्रास होणार नाही, अशा अनुषंगाने सूचनाही करण्यात आल्या. ..... असा होता बंदोबस्त - पोलिस उपायुक्त : ४ - सहायक आयुक्त : ७ - पोलिस निरीक्षक : ५५ - सहायक/उपनिरीक्षक : १२० - अंंमलदार : १८०० - होमगार्ड : ६०० - शीघ्रकृती दल : २ तुकड्या - राज्य राखीव पोलिस दल : २ तुकड्या - बॉम्बशोध-नाशक पथक ..... एका पॉइंटवर एक अधिकारी ध्वजारोहणासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ओझर विमानतळावरून नाशिककडे येतील, असे गृहीत धरून बंदोबस्ताचे नियोजन केले. आडगाव ते पंचवटी आणि गोदाघाटावर फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. एका पॉइंटवर आज एक अधिकारी व चार अंमलदारांची नियुक्ती होती. प्रत्यक्ष ध्वजारोहणाच्या दिवशी यात वाढ केली जाणार आहे. व्हीआयपी मार्गनिहाय फिक्स पॉइंटही वाढविण्यात येतील. त्याच अनुषंगाने आज बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. ---कोट सिंहस्थाचे ध्वजारोहण सोहळा होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. यानिमित्ताने प्रत्यक्ष पाहणी करीत संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन कसे असेल, त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे बंदोबस्त तैनात केला आहे. सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत, त्या दृष्टीनेही बंदोबस्ताचे नियोजन केले, त्याचीच रंगीत तालीम घेण्यात आली. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com