नाशिक: रामतीर्थावरील धार्मिक विधींचे नियमन करणाऱ्या श्री गंगा गोदावरील पंचकोटी पुरोहित संघातील अध्यक्षांसह अन्य पदांबाबतचा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. संस्थेच्या अध्यक्षपदी आपणच असल्याचे सांगून शुक्रवारी (ता. २५) चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्याबरोबरच संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. दुसरीकडे शनिवारी (ता. २६) सतीश शुक्ल यांनी यजुर्वेद मंदिरात सर्वसाधारण सभा घेत रविवारी (ता. २७) वस्त्रांतरगृहात नवीन कार्यकारिणीची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले.