नाशिक: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी १९९२ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात उभारण्यात आलेले वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. पंचवटी विभागीय कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. रामकाल पथ निर्माण करण्यात, तसेच सूर्याची किरणे रामतीर्थापर्यंत पोहोचण्यास वस्रांतरगृहाचा अडथळा निर्माण होत असल्याने ताब्यात घेऊन नंतर पाडकाम केले जाणार आहे.