नाशिक- लाखो रुपये खर्च करून चोवीस वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्यावेळी महिला भाविकांच्या सोयीसाठी रामतीर्थावर दोनमजली वस्त्रांतरगृह बांधण्यात आले. परंतु सद्या देखभालीअभावी वस्त्रांतरगृहाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. तेथील मोठ्या प्रमाणावरील दुर्गंधीने येणाऱ्या महिलांना नाक मुठीत धरूनच चालावे लागत आहे.