Fake Voter Registration
sakal
इंदिरानगर: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ मधील राणेनगर, चेतना नगर भागातील मतदार यादी क्रमांक ३३१ मध्ये १०० पेक्षा जास्त मतदार फ्लॅट क्रमांक २ रघुवीर अपार्टमेंट या एकाच पत्यावर आढळून आल्यासंदर्भात रविवारी (ता.२६) सकाळ मध्ये ‘एकाच फ्लॅटमध्ये शंभर पेक्षा जास्त मतदार’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी यांच्यासह सिडकोच्या विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी या संदर्भात फ्लॅट मालक रुक्मिणी सोनपसारे आणि त्यांचा मुलगा राजेश यांच्याकडे चौकशी केली.