Nashik exhibition
sakal
नाशिक: ‘साहेब, ही नोट माझ्या आजोबांकडची आहे. काहीतरी खास असणार!’ ‘क्रमांक चांगला आहे; पण छपाई सामान्य आहे.’ ‘मग किती मिळतील?’ ‘एकशे पाच रुपये.’ ‘अहो, पण नोट शंभराची आहे!’ ‘इथे भाव नोटेचा नाही, दुर्मिळतेचा असतो!’ हा संवाद आहे, गंगापूर रोड येथील चोपडा लॉन्सवर भरलेल्या ‘रेअर फेअर २०२६’ या दुर्मिळ नाणी, नोटा आणि इतर ऐतिहासिक वस्तूंच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचा.