(पट्टा)
------
वरुळ स्कूलमध्ये
‘रास रिदम २०२६’
शिरपूर : वरुळ येथील आर. सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ‘रास रिदम २०२६’ हा सांस्कृतिक सोहळा झाला. माता- पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सृष्टी दर्शन देवी सजावट स्पर्धा, द्वार दर्शन तोरणनिर्मिती व सजावट स्पर्धा आणि रास शृंगार दांडियासाठी दागिने तयार करण्याची स्पर्धा झाली. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनी नऊ देवींच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी देवीला समर्पित विशेष नृत्य सादर केले. अंतुर्लीचे सरपंच धर्मेश ईशी, मुख्याध्यापक सी. जी. पाटील उपस्थित होते. नृत्यदिग्दर्शक चव्हाण यांनी नृत्यस्पर्धेचे परीक्षण केले. लोकेश बोरसे यांनी संगीत व्यवस्थेचे संयोजन केले. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. पल्लवी पाटील, गायत्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. श्यामकांत पवार यांनी आभार मानले. मुख्याध्यापिका सपना मराठे व सहकाऱ्यांनी संयोजन केले.
आर. सी. पटेल
‘आयएमआरडी’चे यश
शिरपूर : येथील आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. परिसंस्थेतील चार प्राध्यापक व ४१ विद्यार्थ्यांची अविष्कार स्पर्धेत विद्यापीठस्तरावर निवड झाली. स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर व पदव्युत्तर पदवी असे तीन गट होते. पदवी स्तरावर ७६ संघांमधून १३७, तर पदव्युत्तर स्तरावर ३३ संघांमधून ६१ विद्यार्थ्यांनी व पाच प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी प्रा. मिलिंद पाटील, प्रा. सपना येशी, प्रा. छाया पाटील व प्रा. दिनेश बोरसे यांची निवड केली. पदवी गटामधून अॅग्रीकल्चर ॲन्ड अॅनिमल हसबँडरी, कॉमर्स ॲन्ड मॅनेजमेंट, इंजिनीरिंग ॲन्ड टेक्नऑलॉजि, ह्युमॅनिटीस लँग्वेज फाईन आर्ट्स आणि प्युअर सायन्स अशा विविध प्रवर्गामधून एकूण १६ गटांमध्ये ४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, डॉ. मनोज बेहेरे, डॉ. मनोज पटेल, डॉ. तुषार पटेल यांनी स्वागत केले.
पटेल अभियांत्रिकी
क्रीडा स्पर्धेत चमकले
शिरपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत येथील आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी उद्घाटन केले. कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. कर्णधार वैभव पाटील याने नेतृत्व केले. खो- खो स्पर्धेतही मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. कर्णधार योगेश पवार याने नेतृत्व केले. विजेत्या संघातील खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. एन. एस. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
जंतनाशक गोळ्यांचे
विद्यार्थ्यांना वाटप
शिरपूर : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त येथील आर. सी. पटेल विद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक तराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील, डॉ. महेंद्र साळुंखे, डॉ. नीतू बत्रा, डॉ. संजय पवार, समाधान पाटील, सुनील पवार उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक वाय. व्ही. कोठावदे, पी. एस. पाटील, एस. के. पाटील, पी. व्ही. गव्हाळे, अनिल महाजन आदींनी संयोजन केले.